शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

परभणी :कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रभावी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:25 IST

३५ वर्षानंतरही जिल्ह्यात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले नाही. सध्या कुष्ठरोग्यांची संख्या नगण्य असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी जनजागृती व उपचार करण्याचीे गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ३५ वर्षानंतरही जिल्ह्यात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले नाही. सध्या कुष्ठरोग्यांची संख्या नगण्य असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी जनजागृती व उपचार करण्याचीे गरज निर्माण झाली आहे.कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. त्याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकातील त्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. त्वचेच्या टोकावर परिणाम झालेल्या भागांची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता-पायांची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात-पाय विद्रुप होणे, न खाजणारा, न दुखणारा बधीर चट्टा हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. हॅन्सन या शास्त्रज्ञाच्या नावावरुन कुष्ठरोग ओळखला जातो. संसर्गजन्य व असंसर्गजन्य असे कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत. संसर्गजन्य प्रकारामध्ये कुष्ठरोग्याची प्रतिकार यंत्रणा बचाव करण्यास अपुरी पडते, त्यामुळे कुष्ठरोग्याचे जिवाणू त्वचेमध्ये वाहतात. हा रोग जिल्ह्यासह राज्यातून हद्दपार करण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्याचे ठरविले. १९५५-५६ साली या कार्यक्रमांतर्गत पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एक उद्देशीय पद्धतीने योजना राबविण्यास सुरुवात झाली. १९८१-८२ पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पद्धत लागू करण्यात आली. १९९५-९६ पासून सर्व जिल्ह्यांमध्ये ही उपचार पद्धती सुरु करण्यात आली. जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातही या रोगावर मोफत उपचार केले जातात; परंतु, ही उपचार पद्धती लागू करुनही ३५ वर्षानंतरही जिल्ह्यात १३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून कुष्ठरोग हा हद्दपार करण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.असे आहे कुष्ठरोग्याचे प्रमाणपरभणी जिल्ह्यामध्ये १९९०-९१ पासून बहुविधी औषधोपचार पद्धती सुरु करण्यात आली. जिल्ह्यामध्ये १९८१-८२ यावर्षी १० हजार लोकसंख्येस ७१.१० रुग्ण असे प्रमाण होते. त्यानंतर १९९१-९२ साली हे प्रमाण कमी होत १० हजार लोकसंख्येमागे १५.६० एवढे आले. २००१-०२ या वर्षी ३.८१ असे झाले. त्यानंतर २००५-०६ हे प्रमाण केवळ ०.५४ वर आले. २०१५-१६ या वर्षात पुन्हा कुष्ठरोग्यांच्या संख्येत वाढ होत ०.६५ एवढे आले. सद्यस्थितीत डिसेंबर २०१७ अखेर जिल्ह्यात १३१ कुष्ठ रुग्ण आहेत. त्यामुळे तब्बल ३५ वर्षानंतरही जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग निर्मूलनाची प्रभावी जनजागृती झाली नाही.कुष्ठरोग दिनानिमित्त कार्यक्रममहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग दिन पंधरवाडा साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, ग्रामसभेत कुष्ठरोगाबाबत माहिती देणे, महिला मंडळ, बचतगट यांना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देणे, यात्रेत कुष्ठरोगाबाबत प्रदर्शन भरविणे आदी कार्यक्रम घेतले जातात, अशी माहिती डॉ. एस.एम.बायस, वैद्यकीय अधिकारी एस.एम.कोपुरवाड, डॉ.बिर्ला सरपे, पर्यवेक्षक विष्णू घुगे, एम.जी. पवार, सी.एस. पाटील यांनी दिली.