शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत राष्ट्रीय संमेलन :धर्म मानणाºयांनी शांततेसाठी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:34 IST

देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनी आणि पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवारी परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात राष्ट्राच्या सामाजिक, सांप्रदायिक व आर्थिक समस्यांवर आधारित राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले़ या प्रसंगी लामा लोबजंग बोलत होते़ कार्यक्रमास दिल्ली येथील कॅन्सर इंन्स्टिट्युटचे सहसंचालक अब्दुल मन्नान, मॅक्सीसी अवार्ड विजेते प्रो.संदीप पांडे, विजयवाडा येथील फारुक शुबली, फादर डॉ.बेन्नी कल्लीकट, शहीद भगतसिंग यांचे भाचे प्रो.जगमोहन सिंग, नियोजन आयोगाच्या माजी सदस्या पद्मश्री सय्यदा सैयदैन हमीद, डॉ.मकदुम फारुकी, उद्योजक अब्दुल मजीद पारेख, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, मनपाचे गटनेते भगवान वाघमारे, प्रवीण देशपांडे, हमीद मलीक, पंकज खेडकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, दिल्ली येथील सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनीचे कार्यकारी सदस्य तथा आयोजक अ‍ॅड.मुजाहेद खान आदींची उपस्थिती होती़ लोबजंग म्हणाले, एकमेकांचा द्वेष करणे, अत्याचार करणे अशी शिकवण कोणताही धर्म देत नाही़ परंतु़, धर्माच्या आडून या गोष्टी होत आहेत़ त्यामुळे जगात शांती निर्माण करावयाची असेल तर धर्म मानणाºया व्यक्तींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ प्रेमाच्या माध्यमातूनच शांती प्रस्थापित होते़ तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, ‘वैर से वैर’ या नितीने शांती प्रस्थापित होत नाही़ त्यामुळे मैत्री, प्रेम आवश्यक आहे़ मन हेच यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे मनावर ताबा मिळविला पाहिजे़ प्रत्येकाचे मन शांत आणि पवित्र झाले तर शांती प्रस्थापित होवू शकते़ मनावर ताबा मिळवा आणि चांगले कर्म करा, हीच शिकवण धर्माच्या माध्यमातून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी विविध वक्त्यांनी देशाची सद्यस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात अब्दुल माजीद पारीख, मजहर अली खान, फारुख शुबली, फादर डॉ़ बेनी कालीकत, प्रा़ जगमोहन सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ मुजाहेद खान यांनी प्रास्ताविक केले़