शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:02 IST

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन २० मे रोजी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन २० मे रोजी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील मेंढला (ता.अर्धापूर) येथील नारायण शंकरराव वानखेडे हे १५ मे रोजी पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापु देवस्थान येथे गावातील तिघांसमवेत दर्शनासाठी आले होते. दोन दिवस उलटूनही नारायण वानखेडे हे घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. १७ मे रोजी सातेफळ नदी परिसरातील गोदावरी नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. घटनेच्या तीन दिवसानंतर मयताची पत्नी सुनिता नारायण वानखेडे यांनी रविवारी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.गावातील माधव बालाजी वानखेडे, गजानन राजू नवले व देविदास नवले या तिघांनी संगनमत करुन आपल्या पतीस गंगाजीबापू येथे आणून त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व गोदावरी नदीपात्रात बुडवून त्यांना जीवे मारले, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन चुडावा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना कर्डक, हेड कॉन्स्टेबल भारत सावंत, वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनPolice Stationपोलीस ठाणे