शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विस्तारित एमआयडीसीसाठी बुधवारी मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:32 IST

शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसीमधील प्लॉट संपले असल्याने नवीन विस्तारित एमआयडीसी गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात उभारण्यासाठी ७ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसीमधील प्लॉट संपले असल्याने नवीन विस्तारित एमआयडीसी गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात उभारण्यासाठी ७ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली आहे़परभणी येथील वसमत रोडवरील एमआयडीसीमध्ये जवळपास १७० प्लॉटचे उद्योजकांना वाटप अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले़ सरकारी आकडेवारीनुसार एमआयडीसीत ७० उद्योग बºयापैकी सद्यस्थितीत सुरू आहेत़ तर काही उद्योग बंद पडले आहेत़एमआयडीसीत सद्यस्थितीत नवीन उद्योजकांना प्लॉट देण्याकरीता जागाच उपलब्ध नसल्याने विस्तारित एमआयडीसी उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती़ त्या अनुषंगाने ७ मार्च रोजी मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व काही उद्योजकांची बैठक बोलावली आहे़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे़या बैठकीत गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात विस्तारित एमआयडीसी उभारण्याच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे़ त्यामुळे या चर्चेत नवीन एमआयडीसीसह परभणीत एखादा मोठा उद्योग आणण्याच्या अनुषंगाने सकारात्मक पाऊल उचलले जावे, अशी अपेक्षा परभणीकरांकडून व्यक्त केली जात आहे़परभणी शहरातएमआयडीसीच्या अधिकाºयांची लपवाछपवीील एमआयडीसी विकासापासून दूर राहण्यात अधिकाºयांची निष्क्रीयताही तेवढीच कारणीभूत ठरली आहे़ नवीन उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही़ तसेच आहे त्या उद्योगांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत़ शिवाय या संदर्भातील माहितीही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जात नसल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे़एमआयडीसीमध्ये एकूण किती प्लॉटचे वितरण झाले? त्यातील किती उद्योग सुरू आहेत? किती बंद आहेत? याबाबतची माहिती घेण्याच्या अनुषंगाने सदरील प्रतिनिधीने एमआयडीसीच्या विविध अधिकाºयांशी संपर्क साधला असता ठोस माहिती न देता केवळ टोलवाटोलवी करण्याची भूमिका या अधिकाºयांनी घेतल्याचे दिसून आले़एमआयडीसीचे नांदेड विभागाचे विभागीय अधिकारी कोटेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती मेलवर देतो असे सांगण्याची औपचारिकता पूर्ण केली़ या विभागाचे एक अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी फोनला प्रतिसादच दिला नाही़येथील लिपिक निशांत यलमाटे यांनी बदली झाल्याचे सांगितले़ तर एमआयडीसीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता शिंदे यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले़ त्यामुळे एमआयडीसीच्या माहितीच्या अनुषंगाने हे अधिकारी किती जागरुक आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे़