शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:22 IST

परभणी लोकसभा मतदारसंघा खासदार कोण? याचा फैसला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून लोकसभेचा हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे या निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदारसंघा खासदार कोण? याचा फैसला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून लोकसभेचा हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे या निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे.परभणी लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी २ हजार १७४ केंद्रावर ६३.१० टक्के मतदान झाले होते. मतदारसंघातील १९ लाख ८३ हजार ९०२ मतदारांपैकी १२ लाख ५१ हजार ८२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार उतरले असून खरी लढत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यात होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरली आहे. त्यामुळे आघाडीच्या मतांकडे शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे लक्ष राहणार आहे. परभणी मतदारसंघावर ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून पहिल्यांदाच शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी काँग्रेसने तगडे आव्हान दिले आहे. शिवाय राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीच्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी संपूर्ण अनुभव प्रचारात पणाला लावून प्रचार यंत्रणा राबविली तर शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राजकारणातील आपला ३० वर्षांचा अनुभव पणाला लावून एकाकी झुंज दिली. शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता परभणीमुळे मिळाली असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.कडेकोट बंदोबस्त; ४५० पोलीस तैनातलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीसाठी ३३ पोलीस अधिकारी आणि साडेचारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली.गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणी काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस निरीक्षक, २८ सहायक पोलीस निरीक्षक, १९१ पोलीस कर्मचारी, ३२ महिला पोलीस कर्मचारी आणि शहर वाहतूक शाखेतील ९ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. तसेच आर.सी.पी.च्या दोन आणि एस.आर.पी.ची एक कंपनी नियुक्त केली आहे. तसेच शहरात शिवाजी चौक, अष्टभुजा चौक, ग्रँड कॉर्नर, साने चौक, आझाद कॉर्नर, शाही मशिद, किंग कॉर्नर, शिवशक्ती बिल्डींग आदी १९ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले असून येथे ९५ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. विजयी मिरवणुकीसाठी संभाव्य बंदोबस्त तयार ठेवला आहे. त्यात ४ पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी, ५ महिला कर्मचारी आणि साध्या वेशातील १६ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक