शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

परभणी : चित्रपटांच्या माध्यमातून भाषेविना प्रगट होतात भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:27 IST

करिअर म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकताना सुरुवातीला तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लघुपट बनवावा, असे माझे विचार होते़ मात्र या क्षेत्राचा अभ्यास केला तेव्हा भावनेला भाषेची गरज नसते, असे माझे मत बनले आणि त्यातूनच भावनिक बंधाचा अविष्कार असलेला ‘चाफा’ हा लघुपट तयार झाला, असे दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : करिअर म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकताना सुरुवातीला तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लघुपट बनवावा, असे माझे विचार होते़ मात्र या क्षेत्राचा अभ्यास केला तेव्हा भावनेला भाषेची गरज नसते, असे माझे मत बनले आणि त्यातूनच भावनिक बंधाचा अविष्कार असलेला ‘चाफा’ हा लघुपट तयार झाला, असे दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी सांगितले़परभणी फिल्म क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दिग्दर्शिका देवधर परभणीत आल्या होत्या़ यावेळी त्यांच्याशी संवाद साधला़ तेव्हा लघुपटांच्या निर्मितीबरोबरच या क्षेत्राविषयी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या़ बालपणापासूनच नाटकांची आवड असल्याने अभिनय आणि नाट्यक्षेत्रात मी काम करत गेले़ उषा परब, निखील कुलकर्णी यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले़ पुढे वाचन, निरीक्षण, भाषण, फोटोग्राफी आदी छंद जोपासले़ अनेक स्पर्धेच्या माध्यमातून कलेशी जवळीक निर्माण झाली आणि मी या क्षेत्रात स्थिरावत गेले़ मी मुलगी आहे म्हणून आई-वडिलांनी कधीही बंधने घातली नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले़ चित्रपट दिग्दर्शनात महिला फारच कमी आहेत़ तुम्ही हे क्षेत्र का निवडले? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच चित्रपट क्षेत्राची आवड होती़ त्यातही चित्रपट बनविण्याविषयी स्वत:च्या संकल्पना होत्या आणि या संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्याचे ध्येय मी ठेवले़ त्यामुळे या क्षेत्रात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले़ चित्रपट क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष असा भेद नसतो हे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले़ कलावंत हा कलावंत असतो़ त्यामुळे या क्षेत्रात पदार्पण करताना दिग्दर्शिका बनण्यापेक्षा दिग्दर्शक बननेच मला अधिक आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले़चित्रभाषेच्या माध्यमातून अनेक संकल्पना आपण पडद्यावर मांडू शकतो़ चित्रभाषेला शब्दांचे बंधन नसते़ चाफा हा लघुपटही याच धाटणीतला आहे़ हा माझा प्रयत्न अनेकांना भावला़ विशेष म्हणजे लघुपटाचे कौतुक होत असतानाच अनेक पुरस्कारही मिळाले़ मात्र मी एवढ्यावर थांबणार नाही़ या क्षेत्रातील माझे शिक्षण अजून सुरूच आहे़ यापुढेही दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़मनोरंजनापेक्षा समस्या मांडणे महत्त्वाचेचित्रपट या क्षेत्राकडे मनोरंजनाचे साधन म्हणून सर्वसामान्यपणे पाहिले जाते़ आज अनेक कलाकार या क्षेत्रात दाखल होत आहेत़ त्यामध्ये महिला कलाकारांचाही समावेश असतो़ चित्रपटांची निर्मिती होताना अनेक पात्र महिला कलाकार साकारतात़ परंतु, या सर्व प्रक्रियेमध्ये मनोरंजनाला गौण स्थान देत महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे़ चित्रपटांमधून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनही अधिक सक्षमपणे होवू शकते, असे देवधर यांनी सांगितले़