शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

परभणी : ‘एक मित्र, एक पुस्तक’ने उभारली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:57 IST

येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व्यक्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व्यक्त केला आहे़सामाजिक क्षेत्रात पुढे येऊन काम करण्याचा ध्यास घेत दोन वर्षापूर्वी संकल्प फाऊंडेशनचे बिजारोपण करण्यात आले़ या माध्यमातून सामाजिक भान असलेल्या मित्रांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात केली़ सुरुवातीच्या काळात छोटे स्वरुप असलेल्या या फाऊंडेशनला आता व्यापक स्वरुप मिळाले आहे़ गोरगरीब कुटूंबियांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी एक मित्र एक पुस्तक हा उपक्रम सुरू करण्यात आला़पाहता पाहता या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला़ कृषी, महापुरुषांचे चरित्र, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, बालसाहित्य, मराठी, इंग्रजी शब्दकोष, संत साहित्य अशी साहित्यातील विविध प्रकारांची पुस्तके जमा होवू लागली़ सुमारे ४ हजार पुस्तकांचा साठा या फाऊंडेशनने केला असून, ही पुस्तके सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी तालुक्यातील उजाळंबा येथे म़ बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले़यावेळी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य नितीन लोहट, फाऊंडेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस, सचिव विलास साखरे, सहसचिव मारोती जुंबडे, उपाध्यक्ष प्रा़ सुभाष ढगे, डॉ़ ओमप्रकाश वारकरे, दिनकर जोशी, सतीश शिंदे, संतोष शिंदे, नामदेव शिंदे, रामप्रसाद आवचार, राजू वाघ, बालाजी वाघ, विठ्ठल डोळसे, लांडगे यांची उपस्थिती होती़ दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा़ आपल्याकडील पुस्तके वाचनालयासाठी द्यावीत, असे आवाहन अध्यक्ष आणि सचिवांनी केले आहे़१७० कुटूंबियांना मदत४या फाऊंडेशनने आतापर्यंत १७० कुटूंबियांना मदत देऊ केली आहे़ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबिय, निराधार महिलांना त्यांचे कुटूंब पुन्हा उभे राहण्यास मदत होईल, या दृष्टीने संसारोपयोगी साहित्य, व्यावसायासाठी साहित्य वाटप करण्यात आले़ दसरा, दिवाळी, ईद आणि महापुरुषांच्या जयंतीदिनी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन फाऊंडेशनने वेगळी ओळख निर्माण केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmarathiमराठीhindiहिंदीenglishइंग्रजी