शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातव यांच्या अटकेच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:37 IST

हिंगोलीचे खा.राजीव सातव यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करुन भाजपचा निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हिंगोलीचे खा.राजीव सातव यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करुन भाजपचा निषेध नोंदविला.गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केल्याने पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खा.राजीव सातव यांनाही गुजरात पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचे पडसाद परभणीत उमटले असून, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील उड्डाणपुलावर भाजपाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी संजय लहाने, गौतम भालेराव, धीरज कांबळे, अंगद सोगे, राहुल मोगले, लखन धाडवे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वसमत रस्त्यावरील कृषी विद्यापीठ कमानीजवळ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या वतीने भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बबनराव पवार, ज्ञानेश्वर जोगदंड, सुहास पंडित, गोपीनाथ राठोड, अक्षय देशमुख, सुरेश काळे, गौतम वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.