शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्त्यावर सापडलेले पैशांचे पाकीट युवकांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:56 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या दोन तरुणांनी कौसडी फाटा येथे सापडलेले पैशांचे पॉकेट संबंधित व्यक्तीस परत केले आहे. बोरी पोलीस व ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या दोन तरुणांनी कौसडी फाटा येथे सापडलेले पैशांचे पॉकेट संबंधित व्यक्तीस परत केले आहे. बोरी पोलीस व ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे.बोरीपासूनच जवळच असलेल्या रेपा या गावातील डिगांबर दत्तराव राजे हे बोरी येथे आठवडी बाजारात कामानिमित्त आले होते. आपले काम आटोपून ते बोरी येथील फाट्यावर कौसडीकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत होते. त्याचवेळी त्यांच्या खिशातील पॉकेट खाली पडले असावे. या पॉकेटमध्ये २ हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती.बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या हे दोघे बोरी फाट्यावरुन जात असताना त्यांना हे पॉकेट सापडले. पॉकीटातील महत्त्वाची कागदपत्रे पाहिल्यानंतर संबंधिताला त्याचे पॉकेट मिळाले पाहिजे, या हेतूने या दोन्ही तरुणांनी बोरी पोलीस ठाणे गाठले.बोरी पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील गिरी, बीट जमादार विष्णू गिरी, हवालदार कांदे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पॉकेटमध्ये असलेल्या कागदपत्रांवरील पत्त्यावरुन पोलीस प्रशासनाने रेपा येथील डिगांबर राजे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत कागदपत्रे व रोख रक्कमेसह त्यांचे पॉकेट परत करण्यात आले. तरुणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे बोरी पोलीस व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसा