शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:37 IST

जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण उत्पादनाच्या काही भाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला.तालुक्यातील रामपुरी, वांगी, उक्कलगाव, कोल्हा, इरळद, कोल्हावाडी, हटकरवाडी, खरबा, रुढी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले होते. या बदल्यात लाखोंचा महसूल जमा झाला होता. यापैकी काही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामपंचायतींनी गावातील महत्त्वाची व अति महत्त्वाच्या कामाची यादी करून या कामाचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. जि.प. ने हे ठराव आणि कामाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली. छाननी करून ९ ग्रामपंचायतींना विकासकामासाठी एकूण ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ५० टक्के निधी पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.उर्वरित ५० टक्के निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. यामध्ये कोल्हावाडी गावासाठी ११ लाख रुपये, हटकरवाडी ७१ हजार ५५९ रुपये, खरबा ३८ हजार ८५९ रुपये, ३ लाख ४५ हजार ७१५, रामपुरी ७३ हजार ३७६, वांगी ४ लाख ५२ हजार ९२२ रुपये, उक्कलगाव ६४ हजार ७६५, कोल्हा १९ हजार ३९८ , इरळद ६ हजार ७६३ असा एकूण २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा ५० टक्के निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.निधीचा हिशोब ठेवावा लागणारगौण खनिज खनिकर्म विभागाकडून मिळालेल्या निधीतून विकासकामे करताना ग्रामपंचायतींना वितरित केलेला निधी त्याच कामावर खर्च करावा लागणार आहे. मंजूर निधीपेक्षा जास्तीचा खर्च करता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासकामांचा मासिक प्रगतीचा अहवाल न चुकता ग्रामपंचायतींना सादर करावा लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात कामाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमानुसार काम झाले असल्याची खात्री झाल्यानंतरच उर्वरित निधी वितरित केला जावा, असा आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिला आहे. त्यामुळे मिळालेल्या निधीतून झालेल्या विकासकामांचा चोख हिशोब ठेवावा लागणार आहे.कोल्हावाडी ग्रा.पं.ला : सर्वाधिक निधीगौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल मानवत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये हटकरवाडी ग्रामपंचायतीला १ लाख ४३ हजार रुपये, खरबा ७७ हजार रुपये, रुढी ३ लाख ९ हजार रुपये, रामपुरी १ लाख ६४ हजार रुपये, वांगी ९ लाख २१ हजार रुपये, इरळद १३ हजार ५०० रुपये, उक्कलगाव १ लाख २९ हजार तर सर्वाधिक कोल्हावाडी ग्रामपंचायतीला २१ लाख ६४ हजार रुपयांचा निधी गौण खनिज खनिकर्म विभागांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मात्र यातील ५० टक्के निधी पं.स.ला वर्ग झाला आहे. उर्वरित निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. या निधीतून पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, अंगणवाडी, शालेय साहित्य खरेदी, पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, सिमेंट रस्ते, पथदिवे बसविणे, पाणलोट इ. कामे केली जाणार आहेत.ग्रामपंचायतींनी अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीला सादर केल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.-शैलेंद्र पानपाटील,विस्तार अधिकारी, पं.स. मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीgram panchayatग्राम पंचायत