शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : माधव शेजूळ, मनिषा वाघमारे यांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:54 IST

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक प्रा़डॉ.माधव शेजूळ आणि सहासी गिर्यारोहक प्रा़मनिषा वाघमारे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला़ येथील अक्षदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती़ सत्कारापूर्वी सत्कारमूर्तींची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक प्रा़डॉ.माधव शेजूळ आणि सहासी गिर्यारोहक प्रा़मनिषा वाघमारे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला़ येथील अक्षदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती़ सत्कारापूर्वी सत्कारमूर्तींची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली़सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा़बंडू जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, प्रा़किरण सोनटक्के, नगरसेवक सचिन अंबिलवादे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, अ‍ॅड़अशोक सोनी, प्रा़ प्रदीप देशमुख, प्रा़मनोज रेड्डी, प्रा़यु़डी़ इंगळे, डॉ़राजगोपाल कालानी, केशव दुधाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मान्यवरांच्या हस्ते प्रा़डॉ़शेजूळ, प्रा़मनिषा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला़ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांनी प्रास्ताविक केले़अध्यक्षीय समारोपात खेळ व खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन खा़ बंडू जाधव यांनी दिले़ प्रा़डॉ़ सुनिल मोडक यांनी सूत्रसंचालन केले़ सोहळा समितीचे समन्वयक रणजीत काकडे यांनी आभार मानले़ या सोहळ्यास क्रीडा प्रेमी नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमा दरम्यान शहरातील विविध संघटना, संस्थांनीही प्रा़ डॉ़ शेजूळ, प्रा़ मनिषा वाघमारे यांचा सत्कार केला़तत्पूर्वी सकाळी शनिवार बाजार येथून सत्कारमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली़ ढोल पथक, झांज पथक, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, लेझीम पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले़ मिरवणुकीदरम्यान ठिक ठिकाणी सत्कारमूर्तीचे स्वागत करण्यात आले़