शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :अवघ्या २० फुटांवरून पाहिला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:08 IST

तालुक्यातील देवठाणा आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेचा इनकार करणाºया वन विभागातील अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या येऊन उभा टाकल्याने आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले असून, वन विभागाचे पथक बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचून प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : तालुक्यातील देवठाणा आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेचा इनकार करणाºया वन विभागातील अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या येऊन उभा टाकल्याने आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले असून, वन विभागाचे पथक बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचून प्रयत्न करीत आहे.तालुक्यातील देऊळगाव दुधाटे परिसरात अज्ञात हिंस्त्र पशूने शेळीच्या पिलांवर हल्ला केल्याची घटना २ मार्च रोजी घडली होती़ ही माहिती वन अधिकाºयांना देण्यात आली़ ग्रामस्थांनी सुुरुवातीपासून अधिकाºयांकडे बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली होती़ परंतु, हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तरस असावा, अशी शक्यता अधिकाºयांनी वर्तविली होती़ या प्रकारानंतर देऊळगाव गावाजवळ असलेल्या देवठाणा परिसरात गायीच्या वासरावर हल्ला करण्याची घटना झाली़ त्यानंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ ६ मार्च रोजी रात्री या अज्ञात पशूचा शोध सुरू असताना वन अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या उभा असल्याचे दिसले़ त्यामुळे हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे़ देवठाणा परिसरात गायीच्या वासरावर हल्ला झाल्यानंतर या पशूच्या पावलांचे ठसे पाहून वन विभागाने बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली होती़ त्यानंतर तातडीने पावले उचलत ६ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वन परिक्षेत्र अधिकारी डीक़े़डाखोरे, व्ही़एऩ सातपुते, भंडारी व इतर अधिकाºयांचा ताफा गावात दाखल झाला़ ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरू केला़दरम्यान, ७ मार्च रोजी सायंकाळपर्यंत बिबट्या हाती लागला नसल्याने देवठाणा, देऊळगाव, लिमला परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ वन विभागाच्या अधिकाºयांनी या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे़बिबट्या पकडण्यासाठी सापळाही रचला़ हल्ला केलेल्या गायीच्या वासराचा मृतदेह व पिंजºयात शेळीचे पिल्लू ठेवण्यात आले़ बिबट्याची शोध मोहीम सुरू असतानाच ६ मार्च रोजी रात्री वन विभागाच्या अधिकाºयांची नजर बिबट्यावर गेली़ अधिकाºयांपासून अवघ्या २० फुट अंतरावर हा बिबट्या होता़ दरम्यान, अधिकारी व गावकºयांना पाहून बिबट्याने तेथून पळ काढला़ बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागाने कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहेत़ बिबट्या सापळ्यात नक्की अडकेल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़