शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत व्याख्यान : जीडीपी वाढविण्यासाठी ग्रामीण भागास प्राधान्य द्या- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:16 IST

देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘नव्या युगाकडे वाटचाल’ या विषयावर एकदिवसीय विवेक व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते़ या प्रसंगी अणुशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़बी़ व्यंकटेस्वरलू यांची उपस्थिती होती़ डॉ़ काकोडकर म्हणाले, भारत देश महासत्ता बनावा हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे़ परंतु, देशातील तरुण त्यासाठी झटताना दिसून येत नाही़ इतर देश तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे आले आहेत़ विकसित देशांनी तयार केलेले तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे़ परंतु, आपल्या देशातील ग्रामीण भागात सोयी, सुविधा व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, ते होत नाहीत़केवळ शहरी भागातच नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करून जीडीपीचा विचार करण्यात येतो़ परंतु, देशाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्य करतात़ त्यामुळे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच देशाचा जीडीपी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले़या कार्यक्रमाचे आयोजन आनंद देशमुख, श्रीपाद देशपांडे, संदीप पौळ, रविशंकर झिंगरे यांनी केले होते. या व्याख्यानास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती़