शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

परभणी : कृषी उत्पादकतेला ८४ गावांत चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:24 IST

कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .राज्यातील कृषी क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पाहता कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राज्यातील १५ आवर्षणग्रस्त जिल्हे व खारपट्टा भागात सुरू करण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला होता. त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यातील २७५ गावांची ही योजना राबविण्यासाठी निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्यात यातील ९ तालुक्यातील ८४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १२ गावांचा समावेश असून या गावांमध्ये ११ ग्रा.पं.त कृषी संजीवनी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून १० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मानवत तालुक्यातील ६ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील ७ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.पाथरी तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ९ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यातील ९ गावांची निवड करण्यात आली असून ८ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.परभणी तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली असून या सर्व गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ८ गावांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालम तालुक्यात ११ गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यापैकी १० गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ८४ गावांमध्ये ८४० हेक्टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये गंगाखेड व जिंतूर तालुक्यात प्रत्येकी १२० हेक्टर जमिनीवर तर मानवत तालुक्यात ६०, सेलू तालुक्यात ७०, पाथरी तालुक्यात १००, सोनपेठ तालुक्यात ९०, परभणी तालुक्यात ५०, पूर्णा, पालम तालुक्यात प्रत्येकी ११० हेक्टरचा लक्षांक आहे.अशी आहेत: प्रकल्पाची वैशिष्टे४नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे ही या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत.४क्रीडा व टेरी यांनी विकसित केलेल्या शास्त्रीय निर्देशांकांचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल मंडळ निहाय उभारणी करण्यात येणाºया स्वयंचलित हवामान केंद्रांकडून प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला देण्यात येणार आहे. शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीGovernmentसरकारFarmerशेतकरी