शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष निवडीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:07 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड होवून महिनाभराची कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होत नसल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड होवून महिनाभराची कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होत नसल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १५ मे रोजी पंडितराव चोखट यांची निवड झाली होती़ माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातून माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी हे पद आपल्या गटाकडे घेतले़ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी स्वत: वरपूडकर उत्सुक होते़ त्या दृष्टीकोणातून त्यांनी तयारीही केली होती; परंतु, वरपूडकर हे प्रक्रिया मतदार संघातून निवडून आल्याने त्यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होता येत नाही, असा आक्षेप हिंगोलीचे भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता़ हा आक्षेप मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी वरपूडकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता़ त्या नंतर ऐनवेळी पंडितराव चोखट यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली़ या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले़ अध्यक्षपदी चोखट यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील उपाध्यक्षपदाची लवकरच निवड होईल, अशी चर्चा होती; परंतु, अध्यक्षांची निवड होवून एक महिन्याचा कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत़त्यामुळे काही संचालक अस्वस्थ झाले आहेत़ प्रशासकीय पातळीवरूनही उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासंदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही़उपाध्यक्षपद हिंगोलीला जाण्याची चर्चाजिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी हिंगोली जिल्ह्यातील ३ संचालकांनी वरपूडकर यांना पाठींबा दिला होता़ यामध्ये खा़ राजीव सातव व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती़ त्यामुळेच बोर्डीकर यांच्या गटाला अध्यक्षपदापासून रोखता आले़ याची उतराई म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हिंगोलीला देण्याची चर्चा होवू लागली आहे़ ही चर्चा प्रत्यक्षात उतरते की परभणी जिल्ह्याकडेच उपाध्यक्षपद कायम राहते, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकElectionनिवडणूक