बुलडाणा : बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने २0१४ मध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुलडाणा आयडॉल स्पध्रेची महाअंतिम फेरी जल्लोषात पार पडली. चिखली मार्गावरील विद्यानगरी सहकार विद्या मंदिराच्या परिसरातील सहकार सांस्कृतिक सभागृहात बुलडाणा आयडॉल स्पर्धा संपन्न झाली. बुलडाणा आयडॉल स्पध्रेत परभणीची शेफाली कुळकर्णी हिने राज्यस्तरीय आयडॉल होण्याचा कि ताब पटकाविला. यावेळी बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्याहस्ते महाविजेती शेफाली कुळकर्णी हिला प्रथम २५ हजार रूपये रोख रक्कमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. परभणी येथील केतकी कुळकर्णी हि या स्पध्रेत उपविजेती ठरली. संचालन महंमद सलीम यांनी केले. स्पध्रेत सचिन गुढे यांचे नेतृत्वाखालील वाद्यवृंदांनी गाण्यांना संगीतसाज चढविला तर डॉ.राजेश उमाळे, उमेश अजानकर व गजानन सोनवणे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
परभणीची कुळकर्णी महाविजेती
By admin | Updated: September 14, 2014 00:35 IST