शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिंतूरचा रॉकेल घोटाळा पडला अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:48 IST

जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने नियमबाह्यरित्या रॉकेलचे नियतन वितरित करून शासनाला लाखो रुपयांना चुना लावल्या प्रकरणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खुलासा देणेही टाळले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने नियमबाह्यरित्या रॉकेलचे नियतन वितरित करून शासनाला लाखो रुपयांना चुना लावल्या प्रकरणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खुलासा देणेही टाळले आहे़जिंतूर तालुक्यातील रेशनकार्ड धारकांसाठी दरमहा १५३ केएल रॉकेलचे नियतन पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात येत होते़ हे नियतन वितरित करीत असताना प्रत्यक्ष कार्डची संख्या आणि वितरित करण्यात येणारे रॉकेल यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती़ ५४२ रेशन कार्डची संख्या असलेल्या गावाला ३ हजार लिटर तर ५६२ रेशनकार्डधारकांची संख्या असलेल्या गावाला फक्त ७०० लिटर रॉकेल वितरित करण्याचा पराक्रम जिंतूरच्या पुरवठा विभागाने केला होता़ एका अर्धघाऊक विक्रेत्यास एका गावाला ५३ रेशन कार्ड असताना तब्बल ८०० लिटर रॉकेल वितरित केले गेले़ तर दुसºया अर्धघाऊक विक्रेत्यास दुसºया गावासाठी ३३७ रेशन कार्ड असतानाही फक्त ३०० लिटर रॉकेल वितरित करण्यात आले़ रॉकेल वितरणाची ही चुकीची व पक्षपाती पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती़ या संदर्भात जिंतूर येथील श्यामसुंदर सुखदेव सारडा यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली़ त्यानंतरही कारवाई होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले़ हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले़ त्यानंतर या प्रकरणात जिंतूर येथील अधिकाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली; परंतु, या नोटिसांना जिंतूरच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवून दिली़ या नोटिसीला उत्तर देण्याची तसदी जिंतूरचे तहसीलदार, नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी घेतली नाही़ शिवाय बजावलेल्या नोटिसीला उत्तर का दिले नाही? याची विचारणाही जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधितांना केलेली नाही़दरम्यान, या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिंतूरचा रॉकेल कोटा कमी करण्यात आला़ परंतु, या पूर्वी चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेल्या रॉकेल नियतन वितरण प्रकरणात कारवाई मात्र करण्याची तसदी घेण्यात आली नाही़त्यामुळे अनियमित रॉकेल नियतन वितरणाचे हे प्रकरण सध्या अडगळीत पडले आहे़ वरिष्ठ अधिकाºयांनीच या प्रकरणात कानावर हात ठेवले आहेत़ शिवाय तक्रारदार श्यामसुंदर सारडा हेही शांत झाले आहेत़ त्यामुळे या प्रकरणाची आता फारशी चर्चा होत नाही़ परिणामी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचे नियतन वितरण करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावणारे महाभाग मोकाट आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार