मागील वर्षभरापासून खासदार संजय जाधव यांच्यासह विविध संघटनांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. शासन दरबारी अनेकांनी पत्रव्यवहार केला. अखेर याबाबतचा निर्णय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून जाहीर केला. यानंतर परभणी शहरातील खा. संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर आ. डाॅ. राहुल पाटील यांच्यासह शिवसेना व अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. तसेच क्रांती चौक परिसरात परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती चौक येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून ढोल-ताशे वाजवून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी खा. फौजिया खान, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, रामेश्वर शिंदे, अजय गव्हाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय महाविद्यालय घोषणेचा परभणीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST