शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अपंग मतदारांसाठी स्वतंत्र प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:45 IST

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वतंत्ररित्या प्रयत्न करणार असून, जिल्हा पातळीवर समितीचीही स्थापना करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वतंत्ररित्या प्रयत्न करणार असून, जिल्हा पातळीवर समितीचीही स्थापना करण्यात आली आहे़जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे़ प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत केली असून, लवकरच अंतीम मतदार यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे़ जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत महिला मतदार, नव मतदार यांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले़ आता अपंग मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ भारत निवडणूक आयोगाने या वर्षासाठी सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे़ त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़याच अनुषंगाने जिल्हास्तरावर एक समितीही गठीत करण्यात आली आहे़ या समितीत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर हे अध्यक्ष असतील़ त्याच प्रमाणे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील़ तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी भोजने, शिक्षणाधिकारी (प्रा़) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (मा़) वंदना वाव्हुळे, महापालिकेच्या उपायुक्त विद्या गायकवाड यांच्यासह सक्षम अपंग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष राजेश तिपाले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ दरम्यान, या समितीची पहिली बैठक शनिवारी पार पडली़

टॅग्स :parabhaniपरभणीParliamentसंसदElectionनिवडणूक