शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाढत्या उन्हाने रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:26 IST

उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतच चालला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असून याचा परिणाम व्यावसायावर होत आहे. लहान बालके, वयोवृद्धांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.महत्त्वाचे काम असल्यावरच नागरिक दुपारी घराबाहेर पडत असल्याचे चित्र सद्यस्थितीत शहरासह तालुक्यात दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामे पुढे ढकल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला जात आहे. उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी टोपी, रुमालाचा वापर वाढला आहे. घशाला कोरड पडल्यावर थंड पेयाचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मानवत तालुक्यात उष्णतेची लाट असून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे रस्त्यालगत थांबण्यासाठीही झाडाची सावली शिल्लक राहिली नाही. त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असलेल्या ठिकाणी थांबणे पसंत करीत आहेत. गेल्या आठ दिवसापासून तापमान वाढतच चालल्याने बाजारपेठेवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे.सायंकाळी ६ वाजेनंंतर बाजारपेठेत गर्दी४उन्हाच्या या लाटेमुळे नेहमी गजबजुन राहत असलेली शहरातील भाजी मार्केट, कापड मार्केट, जिल्हा बँक परिसर, बसस्थानक या प्रमुख ठिकाणांसह तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे परिसर, मोंढा इत्यादी भागांत दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे.४संध्याकाळी ६ वाजल्यानंतर लिंबू सरबत, उसाचा रस पिण्यासाठी दुकानांवर गर्दी करीत आहेत. त्याचबरोबर फळे खरेदी करण्यासाठीही नागरिक गर्दी करीत आहेत.मुलांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, पांढºया कपड्याचा वापर करावा. डोकेदुखी किंवा चक्कर आल्यास डॉक्टरांना भेटावे.-डॉ योगेश तोडकरीबालरोग तज्ञ

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान