शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

परभणी : बोरीतील पक्षीस्थळावर वाढली पक्ष्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:36 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्न व पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्नपाणी पुरविण्याचे काम केले जात आहे.बोरी येथे संजय नगरामधील विठ्ठलराव अंभुरे यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी मागील १५ वर्षापासून पाण्याच्या कुंड्या, घरटे, तारे, झाडे लावून पाणी पिण्यासाठी हौद तयार केला. या ठिकाणी पक्षी येऊ लागले आहेत. तीव्र दुष्काळ निर्माण झाल्यामुळे जंगल व गायरानातील पाणीसाठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे हे पक्षी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करून मोठ्या प्रमाणावर पहाटे ६ वाजल्यापासून विठ्ठलराव अंंभुरे यांनी तयार केलेल्या पक्षीस्थळावर दाखल होत आहेत. त्यामुळे या नगरातील रहिवाशांनी पहाटे चिमणी, रान चिमणी, कावळे, पोपट, साळुंखी, पारव्या, डोंबकावळे, चिरक, पोनपोपट, कबुतरे, सुतारपक्षी, पावशा या पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळत आहे. या पक्षांना दररोज १० किलो तांदूळ, ५ किलो बाजरी असे खाद्य अंभुरे कुटुंबियांकडून दिले जाते.हे पक्षीस्थळ पाहण्यासाठी बोरी व परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शालेय विद्यार्थी अनेक वेळा भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक करतात. सध्या दिवसेंदिवस विविध जातीचे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु, निसर्गरम्य वातावरण तयार करण्यासाठी पक्षी जीवंत असणे गरजेचे आहे. विठ्ठलराव अंभुरे यांनी पक्षीस्थळ उभारून संगोपन व संवर्धन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे गाव परिसरात कौतुक होत आहे.पक्ष्यांची सेवा सुरूच ठेवणारबोरी येथील मी व माझ्या कुटुंंबियांनी पक्ष्यांची सेवा करण्याचे काम मागील पंधरा वर्षापासून सुरू केले आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना पक्ष्यांच्या सेवेतून समाधान मिळते. हयात असेपर्यंत ही सेवा सुरूच ठेवणार आहे. इतरांनी सुद्धा या दुष्काळात पक्षी पाणी व अन्ना वाचून मृत्यूमुखी पडू नयेत, यासाठी पक्षीसेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षीप्रेमी विठ्ठलराव अंभुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीfoodअन्न