शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:17 IST

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच रेशनचे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जून २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे़ जून महिन्यापासून आतापर्यंत २ लाख ६७ हजार ४१३ शिधापत्रिका धारकांची आधार नोंदणी झाली असून, या शिधापत्रिका धारकांना ई-पॉसच्या सहाय्याने धान्य वाटप सुरू आहे़ मार्च २०१८ पासून जिल्ह्यामध्ये एईपीडीएस ही प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाबरोबरच लाभार्थ्याचा अंगठा ई-पॉस मशीनवर जुळवणी झाल्याशिवाय धान्य वितरण करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे ७४ हजार लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात़नोव्हेंबर महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यासाठी नव्याने आधार सिडींग केलेला डाटा वापरला जाणार आहे़ हे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांचे आधार नोंदविले नसतील, अशा सदस्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा ठेवून आधार क्रमांक नोंदविल्यास त्या सदस्याची आधार सिडींग होणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़...तर रद्द होणार शिधापत्रिका४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत कुटूंबातील एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक नोंद झालेला नसेल तर ती शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे़ त्यामुळे ज्या कुटूंबातील एकाही सदस्याचे आधार क्रमांक नोंदविलेले नाहीत, त्यांनी ३० आॅक्टोबरपूर्वी तहसील कार्यालयात जाऊन सर्व सदस्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका रद्द कराव्या लागतील़ नवीन शिधापत्रिकेसाठी पुन्हा तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल़ ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी तत्काळ आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAdhar Cardआधार कार्ड