शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सव्वा लाख बालकांचे केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:03 IST

गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम राबविली जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम राबविली जाणार आहे़गोवर, रुबेला या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे़ या अंतर्गत परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली़ जिल्हा प्रशासनातील जि़प़ आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या मोहिमेत सहभागी झाला असून, शाळा, महाविद्यालयांमधून ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केले जात आहे़ लसीकरणाच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे़ अकराच दिवसांमध्ये जिल्हा आरोग्य विभागाने ७५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला १ लाख ४६ हजार १२२ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले असून, या विभागाने आतापर्यंत १ लाख १५ हजार १६२ बालकांना लसीकरण केले आहे़ जि़प़ आरोग्य विभागाने ७८़८१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत ३० हजार ८८९ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे़ ७ डिसेंबरपर्यंत ३० हजार ८८९ बालकांना लसीकरण करण्यात आले़ जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळून १ लाख ७७ हजार ११ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागातील सर्व यंत्रणा लसीकरण मोहिमेमध्ये गुंतली आहे़ गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला शाळा, महाविद्यालयांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक शाळांमध्ये लसीकरणाचे शिबीर घेऊन सर्व शाळांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे़जानेवारी महिन्यापर्यंत ही मोहीम चालविली जाणारी असून, लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, त्या पूर्वीच उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल