शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

परभणी : गौण खनिजाचे अवैध उत्खनन जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:58 IST

शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.तालुक्यामध्ये एकीकडे अवैध वाळू उपसा जोरात सुरू असताना गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. जिंतूर शहराचे भूषण असलेले मैनापुरी देवस्थान जवळील सर्व डोंगराचे उत्खनन झाल्याने हा भाग ओसाड पडला आहे. या ठिकाणाहून हजारो ट्रॅक्टर मुरुम चोरून नेल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे, शहरालगत असणारा डोंगर भाग, ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला तसेच नेमगिरी रोड या भागात पण अशीच अवस्था आहे. प्रशासनातील काही जणांना हाताशी धरून हा उपसा जोरात सुरू आहे. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला दररोज अनेक वाहनांद्वारे मुरुमाचा उपसा होतो. परिणामी शासनाच्या हजारो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरल्या जात आहे. जिंतूर शहराप्रमाणेच कौसडी येथूनही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. महसूल कर्मचारी आणि यंत्रणेतील काही जणांचे लागेबांधे असल्याने दररोज सर्रास मुरुमाचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा ºहास होत असून, वेळीच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.प्रशासनाला लाखोंचा चुनामुरूम उत्खनन करणारे माफिया प्रशासनाला दोन ते चार ट्रॅक्टरची रॉयल्टी भरतात. मात्र अनेक ट्रॅक्टर मुरुमाची चोरी केली जात आहे. यात शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. जिंतूर शहरासह येलदरी, बामणी, वझर, चारठाणा, आडगाव, कौसडी, बोरी या भागात उत्खनन झालेल्या जागेची स्थळ पाहणी करून नेमक्या किती रुपयांचा मुरूम उत्खनन झाला, याचा शोध महसूल विभागाने घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग