शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सज्जावर तलाठी नसल्यास वेतनवाढ रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:21 IST

जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़‘हस्तलिखित सातबारांसाठी शेतकऱ्यांची धावपळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १५ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय मांडली होती़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी स्वतंत्र आदेश काढले असून, तलाठ्यांना सज्जावर उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे़ सध्या पीक विमा योजनेसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत़ २४ जुलै ही अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख असून, या अर्जासाठी गाव नमुना सातबारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे़ मात्र सातबारा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी काही गावांमधील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात केल्या आहेत़त्यामुळे शेतकºयांना वेळेत सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तलाठ्यांनी २४ जुलैपर्यंत त्यांच्या तलाठी सज्जावर उपस्थित रहावे़ खातेदारांना त्यांची कागदपत्रे वितरित करावीत़ त्याचप्रमाणे गावात बायोमॅट्रिक हजेरी नोंदवावी़ जे तलाठी, मंडळ अधिकारी या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी या आदेशात दिला आहे़नियमांमुळे अडचणजिल्हा प्रशासनाने पीक विम्यासाठी हस्तलिखित सातबारा जोडणे बंधनकारक केले आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे़ विशेष म्हणजे डिजीटल सातबारा उपलब्ध असतानाही त्या ग्राह्य धरल्या जात नाहीत़ प्रशासनाने डिजीटल सातबाराही पीक विम्यासाठी ग्राह्य धराव्यात, अशी शेतकºयांची मागणी आहे़शेतकºयांची वाढली संख्यायावर्षी जिल्ह्यात पावसाने दगा दिला आहे़ अनेक शेतकºयांनी पेरणी केली आहे़ ही पिके काही प्रमाणात उगवली असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांना धोका निर्माण होणार, अशी दाट शक्यता शेतकºयांना वाटत आहे़ परिणामी या पिकांना विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने मोठ्या संख्येने शेतकरी विमा काढत आहेत़ तेव्हा या शेतकºयांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी