शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बुद्धधम्माचे आचरण केल्यास जगाचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:51 IST

संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.बोरी येथील दीक्षाभूमी मैदानावर २५ डिसेंबर रोजी १३ वी बौद्ध धम्म परिषद पार पडली. सकाळी १० वाजता पू.भदंत प्रज्ञाशिल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दुपारच्या सत्रास आ.विजय भांबळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, जि.प. सदस्य रामराव उबाळे, पं.स.चे गटनेते सुभाष घोलप, सखाराम शिंपले, प्रसाद बुधवंत, विजयकुमार चौधरी, माजी सरपंच यशवंतराव चौधरी, शशिकांत चौधरी, ज्योती बगाटे, परमेश्वर साळवे आदींची उपस्थिती होती.पू.भदंत कश्यप थेरो, पू.भदंत पूर्णबोधी, पू.भदंत धम्मदीप, भदंत मुदितानंद, पू.भदंत धम्ममित्र, पू.भदंत संघरत्न, पू.भदंत प्रज्ञाबोधी, पू.भदंत प्रज्ञापाल, पू.भदंत बोधीशील, भदंत धम्मपाल आदींनी धम्मदेसना दिली. बबनराव रसाळ यांनी प्रास्ताविक केले.ज्ञानदेव कनकुटे यांनी सूत्रसंचालन केले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनिल खिल्लारे, उद्धव जावळे, गणेशराव ढेंबरे, प्रकाश घुगे, सुभाष खंदारे, अशोक केशवे, सुलोचनाबाई मोरे, भारत झोडपे आदींनी पुढाकार घेतला.कार्यक्रमास मराठवाड्यातून हजारो उपासक, उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात धम्म उपासकांच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या हस्ते सिद्धार्थ हत्तींअंबिरे, प्रा.डॉ.संजय जाधव, संजय लहाने, रामराव उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु -भांबळे४बोरी येथील दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ.विजय भांबळे यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा दीक्षाभूमीवर उपासकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.चिंतनातून धम्म आचरणाची प्रेरणा : हत्तीअंबिरे४महान बौद्धधम्म चक्राला गतीमान करण्यासाठी विनयसंपन्न भंतेजी व धम्म उपासकांची जबाबदारी मोठी आहे. धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्मचिंतन होत असते. या चिंतनातूनच धम्म आचरण करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.

टॅग्स :parabhaniपरभणी