शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शासनाच्या परिपत्रकाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:18 IST

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन केले़ चार वर्षांपासून एकात्मिक बालविकास योजनेतील हिस्सा कमी केला जात आहे़ सध्या केवळ २५ टक्के हिस्सा या योजनेंतर्गत दिला जात आहे़योजनेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाºयांना किमान वेतनही नाकारले जात आहे़ या विरुद्ध आयटकच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलना दरम्यान, शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली़१६ जुलै रोजी काढलेल्या या परिपत्रकानुसार २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचे समायोजन शेजारच्या अंगणवाडीत करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे राज्यातील सुमारे २५ हजार अंगणवाड्या बंद करण्याचा घाट घातला जात आहे़तेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन व मासिक पेन्शन लागू करावी, वाढीव घरभाडे देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, १६ जुलै रोजीचे परिपत्रक रद्द करावे, दोन वर्षांपासूनचा थकीत प्रवास भत्ता अदा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सचिव अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख, ताहेरा बेगम, अर्चना कुलकर्णी, सुनिता धनले, सविता ढाले, नजमा बेगम, गोदावरी रासवे, आशा गाढे, संगीता ढवळे, राजश्री गाडे, ज्योती कुलकर्णी, रेखा गायकवाड, रेखा पानपट्टे, शाहेदा बेगम, शामा परवीन आदींसह अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार