शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:42 IST

गंगाखेड (परभणी) : येथील श्री बालाजी मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी मनोभावे रथ ओढून गाव प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री उशिरा साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : येथील श्री बालाजी मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी मनोभावे रथ ओढून गाव प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री उशिरा साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.गंगाखेड येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री तिरुपती बालाजीचे उपपीठ असलेल्या गंगाखेड येथील बालाजी मंदिरात परंपरेनुसार नवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी सकाळी मंदिराच्या गाभाऱ्यातील छोट्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजता मानकºयांच्या उपस्थितीत ३० फुट उंच असलेल्या रथाला शेतातील नवधान्याने सजवून रथात वस्त्रालंकाराने सजविलेली श्री बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचक्रोशितील जमलेल्या हजारो भाविकांनी रथाच्या दोन्ही बाजुंनी बांधलेले दोरखंड ओढून श्री लक्ष्मी रमण गोविंदाचा जयघोष केला. श्री बालाजी मंदिर परिसरातून रथाची मिरवणूक काढून तारुमोहल्ला, शनिमंदिर, रेल्वे स्टेशनरोड, डॉ.आंबेडकर नगर, दिलकश चौक, संत जनाबाई मंदिरमार्गे, बालाजी मंदिरापर्यंत गाव प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी रथाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या भाविकांनी रथावर बतासे व फुलांची उधळण करीत जागोजागी आरती करुन बालाजीचे दर्शन घेतले. गाव प्रदक्षिणा पूर्ण करुन रथ मंदिरात आल्यानंतर अश्व वाहनातून श्री बालाजी मूर्तीची गाव प्रदक्षिणा काढण्यात आली. रात्री उशिराने शहरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रावण दहन सोहळ्यास आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, अ‍ॅड.गौतम भालेराव, बाळकाका चौधरी, राजकुमार सावंत, अ‍ॅड.संतोष मुंडे, शेख युनूस, संयोजक गोविंद यादव, सुशांत चौधरी आदींच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.४तीस फुटी लाकडी रथाला शेतातील नवधान्याने सजविण्यात आलेल्या रथात वस्त्रलंकाराने सजवलेली श्री बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. भाविक रथाच्या दोन्ही बाजुने बांधलेले दोरखंड ओढुन श्री लक्ष्मी रमण गोविंदाच्या जयघोष करीत होते. तारू मोहल्ला, शनी मंदिर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. आंबेडकर नगर, दिलकश चौक, संत जनाबाई मंदिर मार्गे बालाजी मंदिरपर्यंत गाव प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणी