शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक :काँग्रेस, शिवसेनेचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:40 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस आहे़ २ मे पर्यंत एकाही उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला नव्हता़ २ मे रोजी सकाळी शिवसेनेकडून अकोला येथील आग़ोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ त्यांच्या समवेत खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे आदींची उपस्थिती होती़ त्यानंतर दुपारी २़३० च्या सुमारास काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, अ‍ॅड. अशोक सोनी, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती़ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना माजी आ़ सुरेश देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे आपण अधिकृत उमेदवार आहोत़ त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ यावेळी सुशीलकुमार देशमुख यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला़अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस२ मे रोजी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी ३ मे रोजीही त्यांच्याकडून आणखी एक-एक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे़ याशिवाय राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हेही ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़ यासाठी राष्ट्रवादी भवन येथून पक्षाचे नगरसेवक, जि़प़ सदस्य व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रॅली सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे़ यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ विजय भांबळे, आ़ मधुसूदन केंद्रे आदींची उपस्थिती राहणार आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस असल्याने आणखी एक ते दोन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होवू शकतात, असे सूत्रांकडून समजते़अंतिम मतदार यादी प्रसिद्धया निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने अंतीम मतदार यादी एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे़त्यानुसार या मतदार संघात ५०३ मतदार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकाºयांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे़भाजपाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हस्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती राज्यस्तरावर होणार असल्याची बुधवारी दिवसभर चर्चा होती़ अशातच शिवसेनेने बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला़ भाजपाकडून मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत बुधवारी कुठल्याही घडामोडी घडल्या नाहीत़गुरुवार हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे़ या दिवशी भाजपाकडून उमेदवारी दाखल होते की गेल्या १५ दिवसांपासून या पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याची घडविण्यात आलेली चर्चा निरर्थक ठरते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकHingoliहिंगोली