शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: कापसाला सर्वाधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू ( परभणी ): मागील ५ दिवसांपासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): मागील ५ दिवसांपासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल ६ हजार ३५५ रुपये प्रती क्विंटल एवढा भाव मिळाला. या कापूस हंगामातील हा दर सर्वाधिक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.या कापूस हंगामात अनेक वेळा कापसाच्या भावात चढ-ऊतार पाहावयास मिळत आहे;परंतु, या आठवड्यात कापसाच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. १ एप्रिल रोजी सेलू शहरात कापसाला ६ हजार १५० रुपये एवढा कमाल भाव मिळाला होता. मात्र गुढी पाडव्याच्या आदल्याच दिवशी कापसाच्या भावात प्रती क्विंटल २०० रुपयाने वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल भाव ६ हजार ३५५ रुपये तर किमान भाव ६ हजार २१५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच सरासरी भाव ६ हजार २७५ रुपये होता. यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने कापसाच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. कापसाची पहिली वेचणी झाल्यावर कापसाचे भाव मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाहीत. त्यामुळे सणासुदीला व घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यावेळी कवडीमोल भावाने कापूस विक्री करावा लागला; परंतु, एप्रिल महिन्यापासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. ज्या शेतकºयांनी व व्यापाºयांनी कापूस तसाच ठेवला होता, त्यांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे.यंदा : ३ लाख ६० हजार क्विंटल खरेदीशहरात तालुक्यासह परतूर, मंठा व इतर भागातून कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे दरवर्षी सेलूत कापसाची चांगली खरेदी होते. यावर्षी मात्र दुष्काळामुळे केवळ ३ लाख ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ही खरेदी गतवर्षीच्या तुलनेत निम्मी आहे. शहरात ९ कापूस जिनिंग असून यंदा मात्र चारच जिनिंग सुरू आहेत.दुष्काळी स्थितीमुळे कापसाचे उत्पन्न४तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पीक घेतात. त्यातच सिंचनाखाली जमीन कमी आहे. त्यामुळे पावसावरच पिकांचे उत्पन्न अवलंबून आहे. यंदा बाजार समितीच्या आकडेवारीनुसार कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली आहे. या पार्श्वभुमीवर कापसाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारcottonकापूस