शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:18 IST

पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेसह मसाज सुविधा पुरविण्याचा उपक्रम येथील संवगडी ग्रुपने ३ वर्षांपासून सुरू केला असून, या उपक्रमात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग नोंदवितात. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेसह मसाज सुविधा पुरविण्याचा उपक्रम येथील संवगडी ग्रुपने ३ वर्षांपासून सुरू केला असून, या उपक्रमात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग नोंदवितात. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांनी ‘सवंगडी कट्टा’ हा समूह स्थापन केला आहे. या समूहाच्या माध्यमातून मागील ३ वर्षांपासून मोफत आरोग्यसेवा तसेच मसाज सेवा आणि वारकºयांना मोफत औषधी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी २२ जूनपासून संत जनाबाई मंदिरात मुक्कामी येणाºया पायी दिंडीतील वारकºयांना विविध सेवा मोफत देण्याच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातून पंढरपूरकडे पायी जाण्यासाठी निघालेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या पालख्या गंगाखेड येथील श्रीसंत जनाबाई यांचे दर्शन घेऊन पुढे रवाना होतात. या पालखीतील वारकरी श्रीसंत जनाबाई मंदिर आणि झोपडी येथे मुक्कामी थांबतात.गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे, डॉ. योगेश मल्लुरवार, डॉ.देविदास चव्हाण, डॉ.ऐश्वर्या परळीकर, डॉ.पारस जैन, डॉ.सचिन सुपेकर, डॉ.बालासाहेब मानकर, डॉ.मनिष बियाणी आदी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आरोग्य तपासणीसाठी वेळ देत आहेत. तसेच औषधी दुकान चालक व इतर दानशूर व्यक्तींंच्या सामूदायिक सहभागातून औषधी उपलब्ध करून दिली जात आहे.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश औसेकर, गोविंद यादव, प्रकाश घन, मनोज नाव्हेकर, प्रा.मुंजाजी चोरघडे, गजानन महाजन, कृष्णा तापडिया, अक्षय जैन, दिलीप सोळंके, कारभारी निरस, हरिभाऊ सावरे, गोपी मुंडे, सुहास पाठक, नागेश कोनार्डे, संतोष पाठक आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सवंगडी ग्रुपच्या या उपक्रमाचे वारकरी सांप्रदायाकडून कौतूक केले जात आहे.दाढी, कटिंग अन् पादत्राणांचीही दुरुस्ती४दिंडीत सहभागी झालेल्या वारकºयांच्या मोफत आरोग्य तपासणीसह त्यांना औषधींचा पुरवठा करण्याचा उपक्रम सवंगडी ग्रुपने सुरू केला आहे. आरोग्य सेवा देण्याबरोबरच हात, पायांची मसाज करणे, मोबाईल चार्जिंग, पादत्राणे दुरूस्ती, दाढी-कटिंग आदी सुविधाही या ग्रुपच्या सदस्यांनी उपलब्ध करून देण्याचा मानस यावर्षीपासून केला आहे.४मुक्कामाच्या ठिकाणी या सर्व सेवा मिळत असल्याने दिंडीत सहभागी वारकºयांची चांगलीच सोय होते. याबद्दल वारकºयांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdocterडॉक्टरPandharpur Wariपंढरपूर वारी