शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आरोग्य विभागाला रिक्त पदांचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:50 IST

तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़सेलू तालुक्यातील देऊळगाव व वालूर या दोन गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ देऊळगाव आरोग्य केंद्रांतर्गत १२ उपकेंद्र आहेत़ देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत़; परंतु, या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ तेही पूर्णा येथील डॉ़दीक्षित यांची या दवाखान्यात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे़ सद्यस्थितीत एकाच डॉक्टरवर दवाखान्याचा भार आहे़ वालूर आरोग्य केंद्रात ३ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत़; परंतु, दोन पदे रिक्त असून, डॉ़ प्रकाश वाटुरे हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत़ देऊळगाव, वालूर या दोन्ही केंद्रांतर्गत १ लाख २२ हजार २५८ लोकसंख्या येते़ त्यांच्या आरोग्यासाठी दोनच डॉक्टर सद्यस्थितीत कार्यरत आहेत़ तसेच आरोग्य सहाय्यकाचे एक पद, आरोग्य सेविकांची पाच पदे, आरोग्य सेवकांचे १२, कनिष्ठ सहाय्यकांची २, परिचरची ३ पदे रिक्त आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे़ मुबलक प्रमाणात औषधी देखील उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़एक आरोग्य केंद्र दोन उपकेंद्र प्रस्तावित४आरोग्य विभागाने रवळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर गुळखंड व कवडधन या ठिकाणी उपकेंद्र प्रस्तावित केले आहे़ चिकलठाणा येथील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अंतीम टप्प्यात आहे़ हे नवीन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर दोन केंद्राचा भार कमी होईल, अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी आऱएम़ सोनवणे यांनी दिली़बोगस डॉक्टर वाढले४ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा वावर वाढला आहे़ गावांत एक खोली किरायाने घेऊन हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची चर्चा आहे़ या डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ हे बोगस डॉक्टर घरी जाऊन रुग्णांवर उपचार करतात़ शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असल्याची स्थिती आहे़आयुर्वेदिक दवाखान्याला टाळे४सेलू तालुक्यातील कुपटा येथील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टर नसल्याने या दवाखान्याला टाळे लागले आहे़ रुग्णालय झाल्यापासून या ठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टर मिळालेले नाहीत़ विशेष म्हणजे, या दवाखान्याबाबत कुपटा येथील ग्रामस्थांनी वारंवार आरोग्य विभागाकडे तक्रारी, निवेदने देऊनही न्याय मिळाला नाही़ त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन तालुक्यात एकमेव असलेला आयुर्वेदिक दवाखाना कायमस्वरुपी सुरू ठेवावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रुग्णांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीय