शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:17 IST

शहरातील एका गोदामासह अन्य तीन दुकानांवर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले असून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एका गोदामासह अन्य तीन दुकानांवर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून ७ क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले असून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.राज्यात कॅरिबॅग व प्लास्टिक वापरावर बंदी असून कॅरिबॅग आढळल्यास दंड करण्याची तरतूद आहे. शहरातील कोठारी कॉम्प्लेक्स भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याची माहिती उपायुक्त विद्या गायकवाड यांना मिळाली. या माहिेतीच्या आधारे मंगळवारी दुपारी विद्या गायकवाड ह्या कोठारी कॉम्प्लेक्स परिसरात पोहचल्या. त्यानंतर खात्री करुन महापालिकेच्या पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले. या भागातील मॉर्डन प्लास्टिक या दुकानाचे गोदाम बंद होते. दुकान मालकाचा शोध घेऊन त्यास गोदाम उघडण्याचे सूचित करण्यात आले; परंतु, हे गोदाम उघडले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने व्हिडिओ चित्रीकरण करुन गोदामाचे कुलूप तोडले असता आतमध्ये तब्बल ४ ते ५ क्विंटल प्लास्टिक मिळून आले. हे सर्व प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मॉर्डन प्लास्टिक दुकानाच्या मालकाकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर या पथकाने कच्छी बाजार भागातही तीन दुकानांवर कारवाई केली आहे. या तिन्ही दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये या प्रमाणे १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त विद्या गायकवाड यांच्यासह सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विनय ठाकूर, युवराज साबळे, कदम यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी