शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :जीपीएसमुळे उघडकीस आली ट्रक चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:36 IST

चोरलेल्या ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्याची माहिती आरोपींना नव्हती़ परंतु, याच जीपीएसमुळे आंध्रप्रदेशातून केलेली ट्रक चोरी उघडकीस आली असून, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चोरलेल्या ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्याची माहिती आरोपींना नव्हती़ परंतु, याच जीपीएसमुळे आंध्रप्रदेशातून केलेली ट्रक चोरी उघडकीस आली असून, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे़आंध्रप्रदेशातील करीमनगर येथील एऩ मारोती राव यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एपी १५ एक्स- ९५२२) शासकीय कामासाठी लावलेला आहे़ ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी करीमनगर परिसरातीलच लॉरी हाऊसमध्ये हा ट्रक उभा केला होता़ या ठिकाणाहून चोरट्यांनी ट्रक पळविला़ या घटनेनंतर ५ फेब्रुवारी रोजी करीमनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली़ ट्रक चोरीचा तपास करीत असताना ट्रकला लावलेला जीपीएसवरून हा ट्रक परभणीत असल्याचे निदर्शनास आले़ आंध्रातील पोलिसांनी येथील नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांच्याशी संपर्क साधून धार रोड परिसरात या ट्रकचे जीपीएस लोकेशन दाखविले जात असल्याचे सांगितल़े़ गाडेकर यांनी एपीआय सुनील पुंगळे, सय्यद उमर, संजय पुरी, त्र्यंबक बडे, शेख उस्मान या पोलीस कर्मचाºयांना धार रोड परिसरात पाठविले़ मात्र दिवसभर या भागात शोध घेऊनही ट्रक सापडला नाही़ त्यानंतर आंध्रप्रदेशच्या पोलिसांनी प्रत्यक्ष जीपीएस लोकेशन दिले़ या लोकेशनचा झिरो पाँर्इंट काढला तेव्हा धार रोड भागातील एका शेडमध्ये ट्रकची तोडफोड करीत असताना निदर्शनास आले़ पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून करीमनगर ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मीराज यांना ट्रकविषयी माहिती दिली़ ६ फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक लक्ष्मीराज व नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणात पूर्णा तालुक्यातील सुहागन येथून गजानन संभाजी भोसले यास ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़