शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिंतूरमध्ये प्लास्टिक बंदीला प्रशासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिकच्या वस्तुवर बंदी घातली होती़ कॅरीबॅग, पाणी पाऊच, प्लास्टिक ग्लास, द्रोण तसेच इतर प्लास्टिक वस्तू वापरू नयेत, असे आदेश असतानाही या वस्तुंची जिंतूर शहरासह तालुक्यात सर्रास विक्री होत असताना बाजारपेठेत दिसून येत आहे़ प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली होती़ प्रशासनाने तीन महिन्यांची सलवत दिली़ मात्र बंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही़ ५१ मायक्रॉनपेक्षा कमी मॉयक्रॉनचे प्लास्टिक वापरावे, असे आदेश असतानाही या आदेशाचे खुलेआम उल्लंघन होत आहे़ बाजारपेठेतील ७५ टक्के व्यापारी आजही ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़विशेष म्हणजे ग्राहकसुद्धा कॅरीबॅगशिवाय माल घेण्यास तयार नाहीत़ परिणामी बंदीची पर्वा न करता व्यापारी ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़ शिवाय प्लास्टिक ग्लास, द्रोण, पाणी पाऊच व इतर साहित्यांना वापरावयाचे प्लास्टिक सहजपणे उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी नसल्याचेच चित्र जिंतूर शहरात दिसून येत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा पडलेले प्लास्टिकचे साहित्य, कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लास हे बंदी नसल्याचेच द्योतक आहे़ एकीकडे पर्यावरण वाचवा म्हणणारे कॅरीबॅग व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत असताना म्हणावा तसा प्रतिसाद व्यापारी, प्रशासन व नागरिकांकडून मिळत नाही, नव्हे तर त्यांची मानसिकताही नसल्याचे दिसून येते़ परिणामी शासनाचा कितीही चांगला निर्णय असला तरी लोकजागृती व प्रशासनाचा उदासिनपणा यामुळे हा निर्णय कागदावरच राहत आहे़रात्रीच्या वेळी होते वाहतूकप्लास्टिक बंदीचा कोणताही धाक न ठेवता कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लासची रात्रीच्या वेळी वाहनातून सहजपणे वाहतूक केली जाते़ विशेष म्हणजे जालना व नांदेड येथून सर्वाधिक माल शहरात दाखल होतो़ प्लास्टिक बंदीच्या नावावर मोठी भाववाढही झाल्याचे बोलले जात आहे़पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर बंद होणे गरजेचे आहे़ प्लास्टिकमुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे़ प्रशासनाने कठोर पावले उचलून कार्यवाही केली तर त्याचा परिणाम होवू शकतो़ शिवाय जनजागृती होणेही गरजेचे आहे़-अ‍ॅड़ मनोज सारडा, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी