शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

परभणी : पत्नीसह चौघांची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:11 IST

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पत्नीसह तिचे वडील आणि इतर तिघांची परभणीच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पत्नीसह तिचे वडील आणि इतर तिघांची परभणीच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.या निकालासंदर्भात अ‍ॅड.राजू शिंदे यांनी दिलेली माहिती अशी : नगर येथील पूजा शहाणे यांचा विवाह २ मे २००७ रोजी पाथरी येथील गिरीष जोजारे यांच्यासमवेत झाला होता. मात्र विवाहानंतर पती-पत्नीचे आपसात पटत नसल्याने पूजा शहाणे यांनी गिरीष जोजारे व इतर नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत नगर येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. याच दरम्यान ३ जून २००९ रोजी गिरीष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुन गिरीष यांचे वडील सुभाष जोजारे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पूजा शहाणे, तिचे वडील आणि इतर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील अ‍ॅड. राजू शिंदे यांनी असा बचाव केला की, आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही. त्यामुळे आरोपींना निर्दोष सोडावे. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अ‍ॅड.राजू शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.मोहम्मद शाहेद यांनी सहकार्य केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय