शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या १५ फेब्रुवारी रोजी लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या प्रत्यक्ष लाभासाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे़जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, राज्यभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली़ या योजनेंतर्गत शेतकºयांकडील अल्प मुदतीचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला़या निर्णयानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले़ हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, या योजनेंतर्गतची पहिली अधिकृत यादी १५ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार आहे़ जाहीर केलेली ही यादी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यावरून शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली़, कोणत्या खात्यातील कर्जमाफ झाले, याची माहिती उपलब्ध होणार आहे़ही कर्जमुक्ती योजना ३ टप्प्यात राबविली जाणार आहे़ त्यातला पहिला टप्पा हा १ ते १५ फेब्रुवारी असा असून, या काळात पहिली यादी जाहीर करून ती आधार प्रमाणीकरण केली जाणार आहे़ त्यानंतर प्रत्यक्षात शेतकºयांच्या खात्यातील कर्जाची रक्कम माफ होणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना आता कर्जमुक्तीच्या प्रत्यक्ष लाभासाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे़अशी आहे कर्जमुक्तीची प्रक्रिया४१५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिली यादी जाहीर झाल्यानंतर यादीतील खातेदारांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे़ पात्र शेतकºयांना आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यांच्या नावासमोर थम्ब इम्पे्रशनद्वारे अथवा मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीवरून किती रुपयांची कर्जमाफी झाली, याची माहिती मिळणार आहे़ थम्ब केल्यानंतर त्या शेतकºयाचे नाव, आधार क्रमांक, माफीची रक्कम, युनिट आयडी, बँक खाते क्रमांक आदी माहिती स्क्रीनवर दिसणार असून, ही माहिती तपासल्यानंतर शेतकºयाने ‘सहमत’ हा पर्याय निवडल्यानंतरच त्या शेतकºयास कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे़ कर्जाची रक्कम किंवा इतर माहितीत तफावत असल्यास शेतकरी ‘असहमत’ हा पर्याय निवडू शकतात़ त्यानंतर संबंधित खात्याची जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांमार्फत तपासणी केली जाणार आहे़२ लाख ४१ हजार शेतकरी पात्र४४ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २ लाख ४१ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत़ या शेतकºयांकडील १२२४ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे़ अजूनही शेतकºयांचा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत पात्र शेतकरी आणि कर्जमुक्तीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़१३ हजार शेतकºयांचे आधार लिंक मिळेनातया योजनेत ज्या शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याला लिंक आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे़ सद्यस्थितीला जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५ हजार १७८, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेतील ८ हजार १०४ आणि मराठवाडा ग्रामीण बँकेतील ३२१ खातेदारांचे आधार क्रमांक खात्याशी लिंक नाहीत़ त्यामुळे या शेतकºयांनी बँक प्रशासन अथवा विविध कार्यकारी सोसयाटीच्या गटसचिवांशी संपर्क साधून आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज