शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : क्रीडा संकुल जागेची अखेर मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:58 IST

तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेची भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली आहे. दोन कार्यालयांच्या सन्मवयाअभावी रखडलेली जमीन मोजणी झाल्यामुळे क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेची भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली आहे. दोन कार्यालयांच्या सन्मवयाअभावी रखडलेली जमीन मोजणी झाल्यामुळे क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.शहरात खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण व सुविधा मिळाव्यात, यासाठी २००९-१० साली तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.नूतन महाविद्यालयासमोरील जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेवर बास्केट बॉलचे मैदान तयार करण्यात आले होते; परंतु, जागेचा वाद न्यायप्रविष्ट झाल्याने क्रीडा संकूल उभारणी रखडली होती. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जागेचा शोध घेण्यात येत होता; परंतु, आवश्यक तेवढी लागणारी जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र नगरपालिकेने जुन्या स्टेडियम भागातील जागा संपूर्ण प्रक्रिया करून क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभागाला उपलब्ध करून दिली होती. जागा मोजणीसाठी लागणाऱ्या शुल्कावरून क्रीडा विभाग व भूमिअभिलेख कार्र्यालयात अनेक दिवस पत्र प्रपंच सुरू होता.दोन्ही कार्यालये आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे चार ते पाच महिन्यांचा कालावधी जागा मोजणीसाठी लागला. वरिष्ठ अधिकाºयांनी यात हस्तक्षेप करून भूमिअभिलेख कार्यालयास जागा मोजण्याची सूचना केली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी जुन्या स्टेडीयम परिसराची जागा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांनी मोजणी करून दिली आहे. प्राप्त माहितीनुसार जागेचा नकाशा पूर्ण झाल्यानंतर क्रीडा संकुल उभारणीला गती मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका