शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नवीन मतदान यंत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:21 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे़ त्या दृष्टीने सुरुवातीला मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण करण्यात आले़ हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ३१ जानेवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादीही जाहीर करण्यात आली़ मार्च महिन्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे मतदान केंद्र, मतदान यंत्र, निवडणुकीसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी आदी बाबींची पूर्तता केली जात आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये १५०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतदान केंद्रांची सुसज्जताही यापूर्वीच करण्यात आली आहे़ दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यासाठी मतदान यंत्रांचा कोटा मंजूर केला आहे़ त्यात परभणी जिल्ह्यासाठीही मतदान यंत्र प्राप्त झाले आहेत़ १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथून हे मतदान यंत्र परभणी जिल्ह्यात दाखल झाले़ त्यामध्ये ५१० बॅलेट युनिट, ३२० कंट्रोल युनिट आणि ४२० व्हीव्हीपॅट यंत्रांचा समावेश आहे़ रविवारी हे मतदान यंत्र परभणीत दाखल झाल्यानंतर निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी सर्व पक्षप्रतिनिधींना पत्र पाठवून मतदान यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते़ येथील कल्याण मंडपम् परिसरात केलेल्या स्ट्राँग रुममध्ये समन्वय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आणि शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले़राखीव कोटाही झाला उपलब्धजिल्ह्यात १ हजार ५०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी लागणारे मतदान यंत्र यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत़ राखीव कोटा म्हणून आणखी मतदान यंत्र जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत़ जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वी २ हजार ९८६ बॅलेट युनिट, १ हजार ७३६ कंट्रोल युनिट आणि १ हजार ७३६ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत़ नव्याने आणखी मतदान यंत्र दाखल झाल्यामुळे निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा पुरेसा कोटा प्राप्त झाला आहे़ यापूर्वीचे मतदान यंत्र भारत इलेक्ट्रीकल्स लि़ या कंपनीचे होते तर कोल्हापूर येथून आलेले मतदान यंत्र इलेक्शन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि़ (ईसीआय) या कंपनीचे असल्याची माहिती मिळाली़२८ फेब्रुवारी रोजी एफएलसीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची प्रथमस्तरावरील तपासणी (एफएलसी) २८ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे़ या तपासणीमध्ये प्रत्येक मतदान यंत्राची स्वतंत्र सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तपासणी केली जाते़ त्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागतो़ ही तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक