शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत साडेपाच हजार शौचालयांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 12:13 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे.  

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागात परभणी महानगरपालिकेचा समावेशलाखो रुपये या अभियानावर खर्चही झाले; परंतु, वैयक्तिक शौचालयाच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले.

परभणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे.  

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागात परभणी महानगरपालिकेचा समावेश असून या अभियानात सहा महिन्यांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात कामे झाली. सार्वजनिक हगणदारीची स्थळे निष्काशित करुन नागरिकांना शौचालयाच्या वापराचा संदेश देण्यात आला. लाखो रुपये या अभियानावर खर्चही झाले; परंतु, वैयक्तिक शौचालयाच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सद्यस्थितीला सुमारे ५ हजार ७८६ कुटुंबांमध्ये शौचालयाचे बांधकाम झाले नसल्याची बाब समोर आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत परभणी महापालिकेला १३ हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते.

विशेष म्हणजे, यासाठी महापालिकेकडे १३ हजार ७५८ अर्ज दाखल झाले. त्यातून १३ हजार ७०८ अर्ज लाभ देण्यासाठी निवडण्यात आले; परंतु, प्रत्यक्षात या संपूर्ण अभियानामधून केवळ २ हजार १७ शौचालये पूर्ण झाली असून त्याचा वापर सुरु झाला आहे. ५ हजार १९७ शौचालयांचे बांधकाम झाल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. या दोन्ही आकड्यांची गोळाबेरीज केली तर शहरात ७ हजार २१४ शौचालयांचे बांधकाम झाले आहे. प्रत्यक्षात ५ हजार ७८६ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नसल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले असले तरी शहरातील साडेपाच हजार कुटुंब शौचालयाविना असल्याने या कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाचा आधार घ्यावा लागत आहे. 

११ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्तावैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. महानगरपालिकेने स्वनिधीतून आणखी चार हजार रुपये असे १६ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी जाहीर केले आहे. परभणी मनपा अंतर्गत ११ हजार ५८ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला; परंतु, त्यानंतरचे हप्ते मात्र रखडले. त्यामुळे शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.  

सार्वजनिक शौचालये पडली बंदस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत परभणी शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुुंबियांनी या शौचालयाचा वापर करावा, या उद्देशाने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. मात्र उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्याचे कारण देत काही शौचालये बंद पडली आहेत. सध्या तर निम्म्या सार्वजनिक शौचालयांना चक्क कुलूप लावले आहे. या ठिकाणी नियुक्त कलेले कर्मचारीही जागेवर नाहीत.  

टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान