शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सीसीआयच्या विरोधात शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:14 IST

मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़मानवत येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जात आहे़ सीसीआय सर्व कापसाची खरेदी करीत नसल्याने यापूर्वीही शेतकरी संतप्त झाले होते़ या शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते़ त्यानंतर तोडगा काढण्यात आला; परंतु, मंगळवारीही हिच समस्या शेतकºयांसमोर दिसून येत होती़ मंगळवारी सकाळी मानवत बाजार समिती परिसरात सीसीआयकडे कापसाची विक्री करण्यासाठी सुमारे २५० वाहने उभी होती़ मात्र सीसीआयने केवळ ५ ते १० वाहनांतील कापूस खरेदी केला़ इतर वाहनांमधील कापूस नाकारण्यात आला.त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले़ सीसीआयच्या विरोधात थेट जिल्हाधिकाºयांकडेच तक्रार करण्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला़ त्यानंतर मानवत येथून कापसाची दहा वाहने परभणीकडे निघाली़प्रत्यक्ष जिल्हाधिकाºयांनाच कापूस दाखवून तो का खरेदी केला जात नाही, असा जाब विचारला जाणार होता़ ही बाब लक्षात आल्यानंतर मानवतहून येणारी वाहने विसावा कॉर्नर येथेच पोलिसांनी रोखून धरली़ केवळ दोन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली़ शेतकºयांनी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या़ सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात नाही़ यावेळी शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कापूसही जिल्हाधिकाºयांना दाखविला व सर्व शेतकºयांच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी केली़यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, हनुमान मसलकर, मुंजाभाऊ रोडे, भास्कर खटींग, मारोती आवचार, बाबासाहेब आवचार, उद्धव बांगर, बाळू ढगे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस