शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत वीज बिल घोटाळा : अडीच महिन्यानंतर आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:15 IST

महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे.महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलापोटी महावितरण कंपनीस प्रत्येक महिन्यात रक्कम अदा केली जाते. आर.टी.जी.एस. द्वारे ही रक्कम महावितरणकडे दिली जाते. मात्र, महापालिकेतून ही रक्कम महावितरणकडे गेल्यानंतर महापालिकेच्या मीटर क्रमांकाऐवजी खाजगी व्यक्तींचे मीेटर क्रमांक टाकून मनपाच्या पैशांतून खाजगी लोकांचे वीज बिल भरल्याचा प्रकार सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकारानंतर महावितरणने चौकशी समिती नेमली.चौकशीअंती महावितरणच्या चार कर्मचाºयांचे निलंबन केले होते. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश घोरपडे आणि महापालिकेचे कर्मचारी अब्दुल जावेद अब्दुल शकूर या दोघांनी संगनमत करुन ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सहायक अभियंता पवन पुरभा भडंगे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपेंद्र धकाते यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्यावरुन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक एस.ई. मालकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.१२ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव घरजाळे, अमोल वाडेकर यांनी आरोपी अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास अटक केली. इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.