शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: १२ तासांत जाहीर झाला निवडणूक निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:48 IST

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़परभणी लोकसभा मतदारसंघातील २ हजार १७४ मतदान केंद्रांवर १८ एप्रिल रोजी मतदान झाले होते़ त्यानंतर २३ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली़ प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली असली तरी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला नाही़त्यामुळे उत्सुक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़ असे असले तरी संपूर्ण दिवसभर प्रशासकीय यंत्रणेने अचूक मतमोजणी करीत निकाल जाहीर केला़ यासाठी ३२८ कर्मचारी व २४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे स्वत: मतदान केंद्रावर सकाळपासून ठाण मांडून होते़ पहिल्या फेरीपासून १२ व्या फेरीपर्यंत त्यांनी स्वत:च उमेदवारनिहाय मतांची घोषणा केली़ त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी पुढील फेºयांची घोषणा केली़यावेळी पोलिसांच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानाच्या बाजुला उभारण्यात आलेल्या लाकडी कठड्याजवळ वाहतूक व इतर विभागाचे पोलीस कर्मचारी सकाळपासून ठाण मांडून होते़ येथील प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी राहुटी टाकून भर उन्हात खडा पहारा दिला़ त्यांना इतर अधिकाºयांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत होते़पोलीस कर्मचाºयांच्या या राहुटीसमोरील मैदानात अधिकारी व कर्मचाºयांच्या वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती़ मतदान केंद्र व केंद्रबाहेर ३३ अधिकाºयांसह ४५० पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ यावेळी त्यांनी खडा पाहरा देऊन उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला़ तसेच मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली़व्हीव्हीपॅटच्या मतांचीही यशस्वी मोजणी४परभणी लोकसभा मतदार संघात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर झाला़ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मते मोजण्यात आली़ हे काम तसे कीचकट होते़ प्रशासनाने यातही योग्य नियोजन करीत वेळेमध्ये व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली़ विशेष म्हणजे मतमोजणीनंतर कुठलाही आक्षेप दाखल झाला नाही़ त्यामुळे प्रथमच केलेली ही मोजणी यशस्वी ठरली़४सलग १२ तास प्रशासकीय यंत्रणेने मतमोजणीचे कामकाज केले़ रात्री साधारणत: ७़४५ वाजेच्या सुमारास शेवटच्या २९ व्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला़ त्यानंतर अंतीम निकाल असल्याने निवडणूक अधिकारी पी़ शिवशंकर यांनी या निकालाविषयी आक्षेप नोंदविण्यासाठी अथवा काही अडचण असल्यास ती नोंदविण्यासाठी दहा मिनिटांचा कालावधी दिला होता़ त्यानंतर ८ वाजेच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल