शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेलू शहरात आढळले डेंग्यूचे आठ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:28 IST

तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.१५ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. कधी उष्ण तर कधी थंड तर कधी दमट वातावरण तयार होत असल्याने विषाणूंची वाढ होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप, अंग दुखीने नागरिक त्रस्त आहेत. यात बाल रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तापीने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी रक्त तपासणी करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत. रक्त तपासणीच्या अहवालावरुनच उपचार केले जात आहेत. शहरात चार रक्त तपासणी केंद्र आहेत. २४ सप्टेंबर रोजी या केंद्रांमधून माहिती घेतली तेव्हा ८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये थंडी, ताप, अंगावर लाल पुरळ पडणे, डोके दुखणे, उलटी, रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, अशी लक्षणे आढळतात, अशी माहिती डॉ.ऋतुराज साडेगावकर यांनी दिली.१६ घरांमध्ये डासांच्या अळ्याविषाणूजन्य तापाची लागण झाल्याने आरोग्य विभागाने शहरातील ४५० घरांमध्ये डेंग्यू डास निर्माण करणाऱ्या अळींची तपासणी केली, तेव्हा १६ घरांमध्ये अशा प्रकारच्या अळ्या आढळल्या आहेत. या अळ्या नष्ट करण्यासाठी अबेट औषधांचा वापर केला जात आहे.रक्त नमुने तपासणीसाठी पाठविणारखाजगी रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयाला दिलेल्या माहितीनुसार डेंग्यू संशयित तीन रुग्ण आढळले आहेत. इतर रुग्णालयातून याबाबत माहिती घेतली जात आहे. डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्त नमुने पुणे येथील रक्त तपासणी शाळेत पाठविले जाणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली.फवारणीची मागणीपावसाचा खंड पडल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नगरपालिकेने डास निर्मूलन करण्यासाठी धूर फवारणी करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटल