शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

परभणी: बसस्थानकातील पाणपोईची झाली दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:04 IST

येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाल्याने तापत्या उन्हात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाल्याने तापत्या उन्हात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़संत जनाबाई यांची जन्मभूमी व परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या गंगाखेड येथील बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी दोन पाणपोर्इंची उभारणी करण्यात आली आहे़ सद्यस्थितीत या दोन्ही पाणपोर्इंची दुरवस्था झाल्याने यामध्ये पाणी साठवण बंद केली आहे़ त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे बसस्थानकात पाण्याअभावी हाल होत आहेत़ परिणामी प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ विशेष म्हणजे गंगाखेड बसस्थानकातून ये-जा करणाºया प्रवाशांसाठी शहरातील भंडारी परिवाराने सहा वर्षापूर्वी स्वखर्चातून बसस्थानक परिसरात विंधन विहीर घेतली होती. यावेळी उभारलेल्या पाणपोईचे ८ नळ निखळून पडले आहेत़ त्याचबरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजुस असलेल्या फिल्टरसह बसविलेली पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात पाणपोई सुरू करणाºया सामाजिक संघटना, खाजगी संस्थांनी सध्या तरी पाणपोई सुरू केल्याचे दिसत नाही़परिणामी प्रवाशांना सध्या तरी विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़लोकसहभागातून घेतला बोअरगंगाखेड बसस्थानकात असलेल्या जुन्या दोन्ही बोअरची पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे आगारातील वाहनांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी लागणारे पाणी उपलब्ध व्हावे, या करीता आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी वर्गणी गोळा करून एक बोअर घेतला आहे़ परंतु, हा बोअरही केवळ २० मिनिटे चालत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे कर्मचाºयांतून बोलले जात आहे़ विशेष म्हणजे गंगाखेड आगारातील बस धुण्यासाठी तसेच कार्यरत कर्मचाºयांसाठी विकतच्या पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे स्थानक प्रमुख आऱव्ही़ हडबे यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी