शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:29 IST

सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा घोटाळा झाल्याची बाब १० जानेवारी रोजी उघडकीस आली होती़ या संदर्भातील वृत्त ११ जानेवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती़ या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी गोदामपाल एस़एम़ कांबळे यांना निलंबित केले आहे; परंतु, येथील गोदामाची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाºयांवर होती, त्या अधिकाºयांवर मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही़ या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी पालमचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानुसार कदम यांनी जिल्हाधिकाºयांना मंगळवारी खुलासा सादर केला आहे़ या खुलाशात त्यांनी स्वत:चीच बाजू मांडल्याचे समजते़ त्यामुळे त्यांचा खुलासा जिल्हाधिकारी कितपत स्वीकारणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ मुळातच पालम येथील गोदामाची नियमितपणे तपासणी होणे आवश्यक होते़ परंतु, तशी तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य अपहाराचा प्रकार झाल्याची चर्चा होवू लागली आहे़ जून २०१७ पासून गोदामपाल कांबळे यांच्याकडे पदभार होता़ त्यानंतरच गेल्या सहा महिन्यांमध्ये धान्य अपहाराचा प्रकार झाल्याचे समजते़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या अधिकाºयांनी या गोदामाची तपासणी केली व पारदर्शकता बाळगली नाही, असे सर्व अधिकारी या प्रकरणात दोषी आढळत आहेत; परंतु, त्यांच्यावरील दोषारोप प्रशासनालाच सिद्ध करावा लागणार आहे़ अन्यथा केवळ एका कर्मचाºयावर कार्यवाही करून धान्य घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होवू शकतो. तशी भीतीही कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे़ आतापर्यंत उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात कर्मचाºयांबरोबरच अधिकाºयांवरही कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु, तशी कार्यवाही झालेली नाही.मुंबईच्या पथकाने ओढले ताशेरेपरभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्य घोटाळा दोन वर्षापूर्वी मुंबईच्या पथकानेच उघडकीस आणला होता़ या पथकाची नियमितपणे गोदाम तपासणी होत असते़ त्या अनुषंगाने २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत या पथकाने जिल्ह्यातील १० गोदामांची तपासणी केली़ सर्वात शेवटी या पथकाने पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची तपासणी केली़ त्यानंतर तयार केलेल्या अहवालात पथकाने गोदामाची सखोल आणि पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य घोटाळा घडल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत या पारदर्शकतेकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवरही कार्यवाहीचा बडगा उगारणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजी