शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परवानगीपेक्षा अधिक वाळुचा केला उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:08 IST

मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी २० मार्च रोजी वांगी येथील वाळू धक्क्याला भेट दिली, तेव्हा परवानगीपेक्षा अधिक वाळू उपसा होत असल्याचा संशय आल्याने ईटीएसद्वारे मोजमाप करण्याचे आदेश त्यांनी दिले होते़ वांगी येथील वाळू धक्का बार्शी येथील श्रीराम कन्स्ट्रक्शनतर्फे अण्णासाहेब काजळे या कंत्राटदाराला सुटला आहे़ ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ४ हजार ४१७ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे़ अप्पर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर भूमिलेख विभागाचे अधीक्षक गामणे यांनी या वाळू धक्क्याची ईटीएसद्वारे मोजणी केली़ यावेळी मंडळ अधिकारी जोशी, तलाठी बागूल यांची उपस्थिती होती़ १४ मार्च २०१८ रोजी मोजमाप केले होते़ त्यावेळी २ हजार ५३८ ब्रास वाळुचा उपसा झाला होता़ २० मार्च रोजी केलेल्या मोजमापात ३ हजार २५९ ब्रास असा आजपर्यंत ५ हजार ८९७ ब्रास वाळू उपसा झाल्याचा अहवाल गामणे यांनी दिला आहे़ त्यामुळे या ठिकाणाहून १ हजार ४१७ ब्रास वाळू अधिक उपसा झाला असून, आता या कंत्राटदाराविरूद्ध काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे़ तसेच वाळू धक्का हा मानवत तालुक्यात असताना ठेकेदाराने दुसरा रस्ता तयार करून मानवत येथील वाळू सोनपेठ, लातूर, बीड आदी ठिकाणी नेली असल्याचेही स्पष्ट झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीlaturलातूरBeedबीड