शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

परभणी : वायुसेनेच्या कारवाईचा जिल्हाभरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:19 IST

भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२००० विमानांनी मध्यरात्री ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या स्थळावर बॉम्ब हल्ले करुन हे स्थळ उद्धवस्त केले. भारतीय वायुदलाच्या या कामगिरीचा परभणी येथे सर्वधर्मियांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. संभाजी सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध धर्मिय समाजबांधव एकत्रित जमले. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रामेश्वर शिंदे, एस.एच. हाश्मी, किर्तीकुमार बुरांडे, बालासाहेब मोहिते, सरदार चंदासिंग, बाबासाहेब फले, साहेबराव देशमुख सोन्नेकर, रितेश जैन, जकील मौलाना, सुभाष जोंधळे, प्रदीप भालेराव, रामजी तळेकर, सुधाकर सोळंके, राहुल भालेराव, राहुल ठाकूर, अरुण पवार आदींची उपस्थिती होती.युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना प्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, संदीप पांगरकर, नगरसेवक सुशील कांबळे, चंदू शिंदे, राहुल खटींग, रामदेव ओझा, गणेश मुळे, तुषार चोभारकर आदी उपस्थित होते.महिला वकिलांनी दिले निवेदन४जिल्हा न्यायालयातील महिला वकिलांनी वायुदलाच्या अभिनंदनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर अ‍ॅड.प्रतिभा बोरीकर, अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, अ‍ॅड.उषा मिसाळ, अ‍ॅड.सुषमा वाठोरे, अ‍ॅड. उमा बिराजदार, अ‍ॅड. सुवर्णा देशमुख, अ‍ॅड. अर्चना देशमुख, अ‍ॅड. प्रतिभा महाजन, अ‍ॅड. संगिता परिहार, अ‍ॅड. फरहीन हाश्मी, अ‍ॅड. सविता अडकिणे, अ‍ॅड. फिरदोस यास्मीन, अ‍ॅड. सारिका गिराम, अ‍ॅड. विशाखा शेळके, अ‍ॅड. प्रियंका दरक, अ‍ॅड. सबिहा फारोखी आदींची नावे आहेत.गंगाखेड येथे जल्लोष४गंगाखेड येथे भारतीय सेनेच्या या कारवाईबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते, माजी सैनिक हवालदार माणिक बडवणे, हवालदार बाबुराव गव्हाणे, मारोती सूर्यवंशी, नारायण मुंडे, नाईक डिगांबर तांदळे, डॉ.सुभाष कदम, रोहिदास लांडगे, मुरलीधर नागरगोजे, प्रदीप भोसले, शिवाजी कांबळे, गणेश सानप, केशव शेळके, गणेश सातपुते, अंकुश कांबळे, राम घटे, दिलीप साळवे, गुणवंत कांबळे, नरेंद्र भालेराव, शंकर बर्वे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक