शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

परभणी : दिल्लीहून आलेले चालक, क्लिनर जिल्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:17 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर क्लिनरसह परभणी शहरात आल्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या फोननंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर क्लिनरसह परभणी शहरात आल्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या फोननंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला एक ट्रक ड्रायव्हर दिल्लीहून क्लिनरसह घरी येणार असल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही माहिती अक्षय देशमुख, विश्वजीत बुधवंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या ट्रकवर पाळत ठेवली. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक ट्रक खानापूर फाटा परिसरात आला व तो घरी जात असताना बुधवंत व देशमुख यांनी सदरील ट्रक थांबवून तो वसमत रस्त्यावरील आर.आर.पेट्रोलपंप परिसरात आणला. त्यावेळी ट्रक चालक व क्लिनर पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी या दोघांनाही उपस्थितांनी कोरोनाबाबतचे दूष्परिणाम सांगितले व आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला. यावेळी ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने दिल्लीहून उत्तरप्रदेशमार्गे परभणीत आल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना देण्यात आली. त्यांनी परभणी मनपाच्या अधिकाºयांना याबाबत कळविले; परंतु, दोन तास झाले तरी कोणीही तेथे आले नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनवर याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुगळीकर यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोंढा पोलीस ठाण्याचे पथक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या ट्रक चालक व क्लिनरला रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करुन क्वारंटाईन करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली