शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १ लाख नागरिकांनी घेतले दारु पिण्याचे परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:47 IST

येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एप्रिल ते डिसेंबर २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ हजार २२४ जणांनी दारु पिण्यासाठीचा अधिकृत परवाना घेतला असून याद्वारे प्रशासनास ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एप्रिल ते डिसेंबर २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ हजार २२४ जणांनी दारु पिण्यासाठीचा अधिकृत परवाना घेतला असून याद्वारे प्रशासनास ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व त्या खालील नियम, विनियम व आदेश या अनुषंगाने दारु पिणाऱ्या व बाळगणाºया व्यक्तीस शासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अजीवन परवान्यासाठी १ हजार रुपये शुल्क घेण्यात येते. तर वार्षिक परवान्यासाठी १०० रुपये आणि १ दिवसीय देशी मद्य सेवन परवान्यासाठी २ रुपये व एक दिवसीय विदेशी मद्य सेवन परवान्यासाठी ५ रुपये शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येते. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत परभणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ९५ हजार २२४ नागरिकांनी दारु पिण्याचे परवाने घेतले आहेत.त्यामध्ये १२ जणांनी अजीवन परवाना तर १२ जणांनी वार्षिक परवाना घेतला आहे. ५९ हजार जणांनी एक दिवसीय देशी मद्य सेवन परवाना घेतला आहे. तर ३६ हजार २०० जणांनी एक दिवसीय विदेशी मद्य सेवन परवाना घेतला आहे. या चार परवान्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.उत्पादन शुल्क विभागाची ३६ प्रकरणांमध्ये कारवाई४राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण ३६ प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यामध्ये देशी दारुचे १०, विदेशी दारुचे ९ दुकान, ११ परमीट रुम, चार बिअर शॉपींचा समावेश आहे.४ यातील ३० प्रकरणे निकाली काढण्यात आले असून ६ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोडीअंती ११ लाख ४० हजार रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसूल केला असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणी